Friday, December 10, 2010

Maitri

रोजच् आठवण यावी असे काही नाही,

रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.

मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,

आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

Marathi Kavita (Poems)

मराठी मुलगा....
कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पण जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !!